About us

OUR Vision & Mission

Empower people and drive positive change

Our Vision


“एक असा भारत घडवूया — जिथे प्रत्येक डोळ्यात स्वप्न असेल, प्रत्येक हातात कौशल्य असेल, आणि प्रत्येक मनात राष्ट्रनिष्ठेची ज्वाला पेटलेली असेल!”

आमचं स्वप्न आहे — एक असा नवा भारत, जिथे ज्ञान हे शक्तीचं शस्त्र असेल, कौशल्य हे आत्मनिर्भरतेचं कवच असेल, आणि तंत्रज्ञान हे प्रगतीचं पंख असेल.


"आम्ही असा समाज उभारू इच्छितो, जिथे शिक्षण हे केवळ रोजगाराचं साधन नसून, जीवन बदलण्याचं माध्यम असेल."


जिथे प्रत्येक गाव डिजिटलदृष्ट्या सक्षम असेल, आणि प्रत्येक तरुणाला आपल्या स्वप्नाचं गंतव्य गाठण्याची ताकद मिळेल.

जिथे प्रत्येक स्त्री उद्योजकतेचं प्रतीक असेल, आणि प्रत्येक कुटुंब ज्ञानाच्या दिव्याने उजळलेलं असेल.

आमचा दृष्टिकोन म्हणजे — स्वप्नांना उड्डाण देणारा भारत, शिक्षणातून सशक्त होणारा भारत, कौशल्यातून प्रगत होणारा भारत, आणि तंत्रज्ञानातून जगाचे नेतृत्व करणारा भारत!

Our Mission


“कौशल्य, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती.”

आमचं ध्येय केवळ प्रशिक्षण देणं नाही, तर प्रत्येक तरुणामध्ये सुप्त असलेली क्षमता जागृत करणं आणि त्याला स्वतःचं भविष्य घडविण्याची ताकद देणं आहे.


“आम्ही प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा पेटवू, प्रत्येक हातात कौशल्य देऊ, आणि प्रत्येक मनात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करू.”


आम्ही विश्वास ठेवतो की बदल पुस्तकांतून नाही, तर ज्ञानाच्या कृतीतून घडतो. त्या दृष्टीने, ड्रिम फ्युचर फाउंडेशन ही फक्त एक शैक्षणिक संस्था नसून, ती एक अशी चळवळ आहे जी शिक्षणातून परिवर्तन, कौशल्यातून प्रगती आणि तंत्रज्ञानातून आत्मनिर्भरता घडवते.


  • स्वप्नांना दिशा देते,
  • कौशल्यांना अर्थ देते,
  • आणि प्रत्येक यशाला प्रगतीचा मार्ग दाखवते.
about us
about us

१०+ वर्षांचा यशस्वी अनुभव

आपल्याबद्दल

आमची वाटचाल – स्वप्नापासून यशापर्यंत

ड्रिम फ्युचर फाऊंडेशनने स्थापना झाल्यापासून अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजपर्यंत फाऊंडेशनने —
  • about

    २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण दिले आहे

  • about

    १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण केंद्रांद्वारे शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत,

  • about

    ५००० पेक्षा जास्त युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत


प्रत्येक उपक्रमाचा उद्देश एकच —
“ज्ञान, कौशल्य आणा आत्मविश्वास यांचा संगम करून युवकांना यशस्वी बनवाे.”

डिजिटल साक्षरता – समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली

संस्था भारत सरकारच्या Digital India आणि प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान यांसारख्या उपक्रमांना बळ देत आहे. आम्ही प्रत्येक गाव, प्रत्येक शाळा आणि प्रत्येक नागरिकापर्यंत डिजिटल शिक्षणाचा प्रकाश पोहोचविण्याचे कार्य करीत आहोत.

आमचे स्वप्न — “डिजिटल साक्षर भारत, आत्मनिर्भर भारत!”

सहभागी व्हा!”
faqs
आमची दिशा

आगामी प्रकल्प

आज अनेक तरुण-तरुणी शिक्षित आहेत, पण योग्य संधींच्या प्रतीक्षेत आहेत. ड्रिम फ्युचर फाऊंडेशन त्यांच्यासाठी “संधीचं व्यासपीठ” बनलं आहे.


संस्थेने Skill India, Digital Employment Mission यांसारख्या उपक्रमांद्वारे तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून दिला आहे.


कौशल्य हेच भविष्य आहे, आणि आम्ही ते भविष्य प्रत्येक हातात देण्यास कटिबद्ध आहोत.

  • इयत्ता १ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी AI आधारित आधुनिक शिक्षण पद्धती
  • व्हिडिओ लेक्चर्स, कार्टून अ‍ॅनिमेशन, गेमिंग टास्क्स, इंटरअ‍ॅक्टिव्ह लर्निंग
  • ३०० पेक्षा जास्त संपूर्ण कोर्सेसचा अभ्यासक्रम
  • प्रत्येक कोर्ससाठी व्हिडिओ, युनिट टेस्ट, मॉक टेस्ट, फायनल टेस्ट व प्रमाणपत्र
  • स्पर्धा परीक्षा मॉड्युल्स – विद्यार्थी व स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी स्वतंत्र विभाग
  • Dream Icon Mobile App – शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस आणि कॉम्प्युटर सेंटर्ससाठी एकाच प्लॅटफॉर्मवर
  • हजारो युवकांना रोजगाराच्या संधी – शिक्षण क्षेत्रातील डिजिटल क्रांतीसोबत रोजगार निर्मिती
आमचा विश्वास

एकत्र आहोत, तर शक्य आहे!

go to top